राज्याच्या काही भागात गारठा वाढला असून आज धुळ्यात सर्वात कमी, ६ पूर्णांक २ दशांश अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदवलं गेलं. नाशिक जिल्ह्यात निफाड इथं ६ पूर्णांक ९, तर नाशिक शहरात ९ पूर्णांक २ दशांश सेल्सिअस दशांश अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे भंडारा, गोंदिया जिल्ह्यात पारा १० अंश सेल्सिअसवर आला आहे. दिवसाही थंडी जाणवत असल्यानं नागरिक शेकोटीचा आधार घेत आहेत. तर बाहेर पडताना उबदार कपडे घालून निघालेले दिसत आहेत.
गेल्या चोवीस तासात मराठवाड्यात अनेक ठिकाणी किमान तापमानात लक्षणीय घट झाली. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातही तुरळक ठिकाणी किंचित घट झाली.
येत्या दोन दिवसात मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी थंडीची लाट राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे.