राज्यात आता थंडीची चाहूल लागली असून अनेक जिल्ह्यांत हंगामातल्या नीचांकी तापमानाची नोंद झाली आहे. मुंबईच्या हवेतली आर्द्रता कमी झाली असून गारवा वाढला आहे. कोकणात रायगड जिल्ह्यात थंडीला सुरुवात झाली असून वातावरण आल्हाददायक झाल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ होत आहे. नाशिक शहरातही दररोज तापमानाचा पारा घसरत असून आज सकाळी १० पूर्णांक ८ दशांश अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. धुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला असून आज सकाळी ८ पूर्णांक ५ दशांश अंश सेल्सियस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली. अमरावती जिल्ह्यातही मध्य प्रदेशातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मेळघाटाचा परिसर गारठला आहे.
Site Admin | November 10, 2025 3:01 PM | Cold | Maharashtra
राज्यात थंडीची चाहूल