शासकीय सेवांच्या भर्ती परीक्षांच्या निकालानंतर ४ दिवसात नियुक्तीपत्रं मिळणार

शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान चार दिवसात संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र द्यावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणांबाबत आयोजित सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. दरवर्षीचा आढावा घेत जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. 

 

नागरिक केंद्रित, जबाबदार आणि सुशासनासाठी मोठ्या प्रमाणावर प्रशासकीय सुधारणा केल्या जात आहे. या सुधारणांमध्ये प्रत्येक विभागानं सक्रिय सहभाग नोंदवत आपला ठसा उमटवावा, असं आवाहनही त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.