डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला स्वावलंबनाचे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून राज्यातल्या महिला स्वावलंबनाचे नवे मार्ग शोधत असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. राज्यातल्या महिलांनी मुख्यमंत्र्यांसाठी रक्षाबंधनानिमित्त राख्या पाठवल्या, त्यानिमित्त मुंबईत कार्यक्रमत आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. महिलांच्या सहभागाशिवाय विकास शक्य नाही, त्यामुळे महिलांना सक्षम करण्यासाठी सरकार अनेक योजना राबवत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.