डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महाराष्ट्र राज्य मंत्रीमंडळ निर्णय…

बाईक टॅक्सी वाहनांच्या समुच्चयक धोरणाला राज्य मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे. त्यानुसार १ लाख लोकसंख्या असलेल्या सर्व शहरांमधे रमानाथ झा समितीच्या शिफारशी सुधारणेसह लागू करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत झाला. 

 

नोंदणीकृत वाहन निष्कासन केंद्रामध्ये स्वेच्छेनं निष्कासित केलेल्या वाहनांच्या अनुषंगानं सुधारित कर सवलत लागू करण्याचा निर्णयही मंत्रिमंडळानं घेतला.

 

वडसा-देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गासाठी १ हजार ८८६ कोटी रुपयांच्या सुधारित खर्चाला मंत्रिमंडळानं मान्यता दिली. यापैकी ५० टक्के, म्हणजे ९४३ कोटी रुपये इतकी रक्कम राज्य सरकार देणार आहे. 

 

गडचिरोली जिल्ह्यातील प्रमुख खनिज आणि विशिष्ट औद्योगिक गौण खनिजाच्या व्यवस्थापनासाठी गडचिरोली जिल्हा खनिकर्म प्राधिकरण स्थापन करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे. त्यासाठीच्या प्रारूप अधिनियमाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. 

 

मार्वल, अर्थात महाराष्ट्र रिसर्च अँण्ड व्हिजीलन्स फॉर एनहान्स्ड लॉ एन्फोसर्मेंट लिमिटेडकडे कृत्रिम बुद्धिमत्ता वापराची कामं प्राधान्यानं देण्याचा निर्णयही या बैठकीत झाला.