जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात कंत्राटी तत्त्वावर कार्यरत असलेल्या आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा निर्णय राज्य मंत्रीमंडळानं आज घेतला. कार्यरत आणि सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य सेविकांना याचा लाभ मिळेल. मंत्रालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. याशिवाय नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीत थेट निवडून आलेल्या नगराध्यक्षांना संबंधित सभागृहाचं सदस्यत्व देण्याचा निर्णयही राज्य सरकारनं घेतला आहे. त्यांना मतदानाचा अधिकारही दिला जाणार आहे. यासंदर्भातला अध्यादेश काढायला राज्य मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली. जिल्हा कर्मयोगी योजनेचा दुसरा टप्पा आणि सरपंच संवाद कार्यक्रमही राज्य सरकार राबवणार आहे. तसंच धाराशिव शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यासाठी दुग्धव्यवसाय विकास विभागाची एक एकर जागा द्यायला मंत्रीमंडळानं आज मंजुरी दिली.
Site Admin | December 24, 2025 3:13 PM | maharashtra cabinet decisions
Maharashtra : जिल्हा परिषदेतल्या कंत्राटी आरोग्य सेविकांना नियमित करण्याचा निर्णय