मुंबईतल्या टाटा मेमोरियल सेंटरच्या एकात्मिक आयुर्वेदिक कर्करोग दवाखाना आणि संशोधन केंद्रात १०० खाटांचं रुग्णालय उभारण्यासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याचा निर्णय आज राज्य मंत्रिमंडळाने घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक आज मुंबईत झाली. राज्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात गट क आणि तांत्रिक संवर्गात २९ दिवस तत्त्वावर कार्यरत १७ कर्मचाऱ्यांची तातपुरती सेवा नियमित करण्याला मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
Site Admin | August 19, 2025 4:57 PM | maharashtra cabinet decisions
महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ निर्णय…
