राज्य सरकार कर्करोग उपचारासाठी सर्वसमावेशक असं धोरण आखून प्रत्येक जिल्ह्यात नागरिकांना कर्करोगावर दर्जेदार उपचार उपलब्ध करुन देणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला. त्यानुसार त्रिस्तरीय समग्र कर्करोग उपचार सेवा निश्चित केली जाईल. राज्यभरात १८ रुग्णालयांमधे कर्करोगाशी निगडीत विशेषोपचार उपलब्ध होतील. यासाठी १०० कोटी रुपये भाग भांडवलाची महाकेअर, अर्थात महाराष्ट्र कॅन्सर केअर, रिसर्च अँड एज्युकेशन फाऊंडेशन ही कंपनी स्थापन केली जाणार आहे.
औद्योगिक, वाणिज्यिक आणि इतर वर्गवारीतल्या ग्राहकांकडून वीज वापरावर अतिरिक्त वीज विक्री कर आकारायला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राज्याचं जागतिक क्षमता केंद्र धोरण २०२५, तसंच महाजिओटेक महामंडळ स्थापन करायलाही मंत्रिमंडळानं मंजुरी दिली.