महाराष्ट्र विधानसभा आणि विधानपरिषदेत सभापती आणि अध्यक्षांकडून कामकाजात एकांगी आणि पक्षपाती भूमिकेचा अवलंब केला जात आहे, अशी तक्रार विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांना पत्राद्वारे केली आहे.
संसदीय प्रणालीमध्ये विरोधी पक्ष हा एक महत्त्वाचा घटक आहे. विरोधी पक्षाची भूमिका ही सरकारविरोधी नसून सरकारचे निर्णय आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. मात्र, विरोधी पक्षांना आणि पक्षनेत्यांना सभापती आणि अध्यक्षांकडून पक्षपाती वागणूक मिळत आहे. सभागृहात विरोधी पक्षाच्या सदस्यांना बोलू न दिल्याने त्यांचा संवैधानिक हक्क डावलला जात आहे. त्यामुळे या प्रकरणात लक्ष घालून विरोधी पक्षांना न्याय मिळवून देण्याची विनंती दानवे यांनी राज्यपालांना केली आहे.