डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर चर्चा

विधानसभेत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी अंतिम आठवडा प्रस्तावावरच्या चर्चेला उत्तर दिलं.  छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांविरोधात अपशब्द वापरणाऱ्या कोरटकर याच्याविरोधात कठोर कारवाई करण्याचं आश्वासनही त्यांनी दिलं. 

 

सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूनंतर झालेल्या शवविच्छेदन अहवालात विसंगती आहे, व्हीसेरा आणि बाह्य अहवाल वेगळा आहे, त्यामुळे या प्रकरणासाठी नेमलेल्या समितीनं अहवाल दिल्यावर त्यानुसार कारवाई करू, संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांनाही सोडलं जाणार नाही, असं ते म्हणाले.

 

राज्यात हुक्का पार्लरचं वाढतं प्रस्थ रोखण्यासाठी यासंदर्भातल्या कायद्यात सुधारणा करण्याची घोषणा त्यांनी केली. हा गुन्हा दखलपात्र केला जाणार असल्याचं ते म्हणाले. 

 

राज्यातील शहरांमधल्या नद्यांच्या पूर पातळीसंदर्भातल्या निळ्या आणि लाल रेषांचं समिती स्थापन करून तातडीनं पुन्हा सर्वेक्षण करण्याचं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज विधानसभेत दिलं. या रेषेत येणाऱ्या जमिनीवर अवैधरित्या विकासकामांची परवानगी दिली असेल तर ती रद्द करून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असं त्यांनी सांगितलं. 

 

मुंबईच्या किनारा नियंत्रण तसंच ना विकास विभागात बेकायदेशीरपणे केलेल्या २६७ बांधकामांविरोधात महापालिकेच्या वतीनं तातडीनं कारवाई करून ती पाडली जातील, अशी घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.