विधानसभेत भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत

महाराष्ट्र विधानसभेत आयसीसी चँपियन्स ट्राफी २०२५ मध्ये अजिंक्य पद पटकाविणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाच्या अभिनंदनाचा ठराव संमत करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अभिनंदनाचा प्रस्ताव सभागृहात मांडला. तो एकमताने संमत करण्यात आला. प्रशिक्षक गौतम गंभीर, कर्णधार रोहित शर्मा यांच्यासह संघातल्या सर्व खेळाडूंचं सभागृहाने  अभिनंदन केलं.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.