मुंबईत जुन्या झालेल्या पागडी इमारतींमध्ये राहणाऱ्या संरक्षित भाडेकरूंचा हक्क अबाधित राखून या इमारतींचा पुनर्विकास केला जाईल, कुणालाही बेघर होऊ देणार नाही, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
या इमारतींच्या मालकांना वाटलं म्हणून ती इमारत पाडून त्यावर टॉवर बांधता येणार नाही, आणि भाडेकरूंना बेघर करता येणार नाही, असं ते म्हणाले. सरकार मालकांचं नुकसान होऊ देणार नाही, मात्र मालकांनी देखील या इमारतींच्या पुनर्विकासला सहकार्य करावं, अन्यथा विशेष कायदा करून भाडेकरूंना संरक्षण दिलं जाईल असं शिंदे यांनी सांगितलं.