ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर

२०२४ या वर्षाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना देण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज विधानसभेत केली. २५ लाख रुपये, मानपत्र, मानचिन्ह, शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. 

 

१०० वर्ष वयाचे राम सुतार यांनी अनेक महत्त्वाच्या व्यक्तींचे पुतळे आणि अनेक शिल्पं घडवली आहेत. केवडीया इथला स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार वल्ल्भभाई पटेल यांचा पुतळा, मुंबईत इंदू मिल इथल्या स्मारकातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा, सिंधुदुर्गात राजकोट इथला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रस्तावित पुतळा यांचा त्यात समावेश आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.