डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर झाली आहे. यात मुंबईतल्या ७ जागांचा समावेश आहे. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून परमेश्वर रणशूर, दिंडोशीतून राजेंद्र ससाणे, मालाडमधून अजय रोकडे, अंधेरी पूर्वमधून संजीव कुमार कलकोरी, घाटकोपर पश्चिममधून सागर गवई तर पूर्वेतून सुनीता गायकवाड आणि चेंबुरमधून आनंद जाधव यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्याखेरीज ऐरोली, ओवळा माजिवडा, रिसोड, भुसावळ, मेहकर, मूर्तिजापूर, बारामती, श्रीगोंदा आणि उदगीर मतदारसंघांच्या उमेदवारांची घोषणा झाली आहे. 

 

Image