डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणूक : काळ्या पैशाच्या वापराची नागरिक करणार तक्रार

राज्यात होणाऱ्या  विधानसभा निवडणूक प्रचारात काळ्या पैशाचा वापर होत असल्याचं नागरिकांच्या  निदर्शनास आल्यास त्यांनी आयकर विभागाला त्याची माहिती द्यावी असं आवाहन आयकर अधिकाऱ्यांनी केलं आहे. निवडणुकीत वापरला जाणारा काळा पैसा, रोख रकमेची वाहतूक किंवा वाटप, अशा  संशयास्पद गोष्टी नजरेस पडल्यास नागरिकांनी थेट आयकर विभागाच्या टोल फ्री क्रमांकावर किंवा मेल आयडी वर संपर्क करावा अथवा ९४०३३९०९८० या व्हाट्सअप क्रमांकावर विडिओ किंवा छायाचित्र पाठवावं असं आवाहन आयकर विभागाचे नागपुरातील उप आयकर निदेशक अनिल खडसे यांनी केलं आहे. अशी माहिती देणाऱ्या व्यक्तीची ओळख गुप्त ठेवण्यात येईल.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.