काँग्रेस पक्षाची ४८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

काँग्रेस पक्षानं ४८ उमेदवारांची पहिली यादी काल जाहीर केली. यामध्ये कराड पश्चिम मतदार संघातून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, साकोली इथून नाना पटोले, ब्रह्मपुरी – विजय वडेट्टीवार, तिवसा – यशोमती ठाकूर, संगमनेर – बाळासाहेब थोरात तर पलूस इथून विश्वजीत कदम यांना 

 

उमेदवारी देण्यात आली आहे. लातूर शहर मतदारसंघातून अमित देशमुख यांना, लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख, हदगाव – माधवराव पाटील, भोकर – तिरुपती कोंडेकर, नायगाव – मिनल पाटील खतगावकर, पाथ्री – सुरेश वरपुडकर, तर फुलंब्री मतदारसंघातून विलास औताडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.