राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची विधानसभा निवडणुकीसाठी पहिली उमेदवार यादी आज जाहीर झाली. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे इथे वार्ताहर परिषदेत ४५ उमेदवारांची नावे जाहीर केली. बारामतीमधून युगेंद्र पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. इस्लामपूरमधून जयंत पाटील, तासगाव कवठे महांकाळ इथून रोहित पाटील तर अहेरीमधून भाग्यश्री अत्राम निवडणूक लढवणार आहेत. घनसावंगीतून राजेश टोपे, काटोलमधून अनिल देशमुख, कोरेगावमधून शशिकांत शिंदे यांची नावं उमेदवार यादीत आहेत. मुंब्रा मतदारसंघातून जितेंद्र आव्हाड यांना पुन्हा संधी देण्यात आली आहेत. तर रोहित पवार यांना कर्जत जामखेडमधून उमेदवारी देण्यात आली आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.