डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरायला सुरुवात

राज्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विविध पक्षाचे उमेदवार अर्ज भरत आहेत. 

 

मुंबईत मागाठाणे आणि जोगेश्वरी पूर्व अशा दोनच मतदारसंघातून आज उमेदवारी अर्ज दाखल झाले. 

 

परभणी विधानसभा निवडणुकीसाठी आज दुसऱ्या दिवशी ४ विधानसभा मतदार संघात ९ उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत.

 

जालना जिल्ह्यात आज तीन उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.

 

लातूर जिल्ह्यातल्या उदगीर मतदारसंघातून २ अर्ज दाखल झाले आहेत. जिल्ह्यातल्या लातूर शहर, ग्रामीण, निलंगा आणि औसा विधानसभा मतदारसंघातून अद्याप एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही.

 

धाराशिव जिल्ह्यात तसंच धुळे जिल्ह्यात आज एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केलेला नाही. नांदेड जिल्ह्यात आज किनवट आणि नांदेड उत्तर विधानसभा मतदारसंघांत प्रत्येकी एका उमेदवाराने अर्ज दाखल केला आहे. 

 

हिंगोली जिल्ह्यात आज १२३ अर्जांची उचल झाली असून वसमत विधानसभा मतदारसंघात जगन्नाथ अडकिने यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. 

 

गडचिरोली जिल्ह्यातल्या अहेरी विधानसभा मतदारसंघातून अजय आत्राम यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. काल दीपक आत्राम या अन्य अपक्ष उमेदवाराचा अर्ज दाखल झाला होता. 

 

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोपरी पाचपाखाडी मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज २८ ऑक्टोबर रोजी दाखल करतील.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.