२० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी सार्वजनिक सेवांमध्ये वाढ

येत्या २० नोव्हेंबरला मतदानाच्या दिवशी रेल्वे, मेट्रो आणि बेस्ट या सार्वजनिक सेवांमध्ये वाढ करण्याचे निर्देश महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगरानी यांनी दिले आहेत. मुंबई आणि मुंबईतल्या उपनगरांसाठी या वाहतूकसेवा महत्वाच्या असून याबाबतची विनंती दहिसर १५३ विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक अधिकारी शीतल देशमुख यांनी आयुक्तांकडे केली होती. त्यानुसार २० नोव्हेंबर रोजी सकाळी ४ वाजल्यापासून ते २१ नोव्हेंबरपर्यंत पहाटे १ वाजेपर्यंत या वाहतूकसेवा सुरू राहणार आहेत. याचा फायदा निवडणूक कर्मचाऱ्यांसह मतदारांनाही होणार आहे.