राज्यात मतदान जनजागृती कार्यक्रमाला सुरूवात

केंद्रीय संचार ब्यूरो, पुणे प्रादेशिक कार्यालयातर्फे राज्यातील १४ जिल्ह्यात आजपासून मतदार जागृती अभियान सुरु करण्यात आलं आहे. मतदारांना खात्रीने मतदान करण्याचं आवाहन करत शहर आणि ग्रामीण भागात दहा दिवस हा प्रचार रथ फिरणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यात जिल्हास्तरीय जनजागृती कार्यक्रमाला आज सुरुवात झाली. अहिल्यानगर जिल्ह्यातही पथनाट्याद्वारे आज मतदार जनजागृती करण्यात आली. सोलापूर जिल्ह्यात आज स्वीप व्हॅनचा प्रारंभ जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आला. धाराशिव जिल्ह्यातही मतदार जागृती यात्रेचा आज प्रारंभ झाला. ही यात्रा जिल्ह्यातल्या ५० गावांमधून फिरणार आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.