विधानसभा निवडणुकीसाठी जोमाने प्रचार

राज्यातल्या विधानसभा निवडणुकीसाठी प्रचार जोमाने सुरु आहे. राज्यातल्या दिग्गज नेत्यांसह इतर राज्यातल्या नेत्यांच्या देखील ठिकठिकाणी सभा होत आहेत. औरंगाबाद मध्य मतदार संघात महायुतीचे उमेदवार प्रदीप जैस्वाल यांनी आज मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मतदारसंघात पदयात्रा काढली. महायुतीचे औरंगाबाद पूर्व मतदारसंघातले उमेदवार अतुल सावे यांनी आज लोकांशी संवाद साधला. वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी आज कन्नड मतदारसंघाचे पक्षाचे उमेदवार अयाज मकबूल शहा यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.