आचारसंहिता लागल्यापासून ४६ हजारांहून अधिक नागरिकांवर प्रतिबंधात्मक कारवाई

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठीची आचारसंहिता लागू झाल्यापासून कालपर्यंत एकंदर ४६ हजार ६३० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम यांनी दिली आहे. ते आज मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. या कालावधीत राज्यात २५२ कोटी रुपयांपेक्षा जास्त किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 

 

सी-व्हिजिल ॲपवर प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी ९९ टक्क्यांपेक्षा जास्त तक्रारी निकाली काढण्यात आल्या. २८८ पैकी १८५ मतदारसंघांमध्ये एक, १०० मतदारसंघांमध्ये दोन, तर ३ मतदारसंघांमध्ये तीन बॅलेट युनिट्स लावण्यात येणार असल्याचंही त्यांनी नमूद केलं. मतदानाच्या सुरुवातीला आणि मतदान संपल्यानंतर मतदान यंत्रांमध्ये किती चार्ज आहे, याची नोंद ठेवण्याच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निर्णय घेऊ, असं ते म्हणाले.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.