डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवार आणि राजकीय पक्षांना गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार

महाराष्ट्र विधानसभेसाठी निवडणूक लढवणारे उमेदवार आणि त्यांच्या राजकीय पक्षांना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशानुसार गुन्हेगारी पार्श्वभूमी प्रसिद्धी करावी लागणार आहे. भारत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार याबाबत सविस्तर निर्देश आणि प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती प्रसिद्ध करण्यासाठी विहीत नमुने देखील दिले आहेत. उमेदवाराविरुद्ध प्रलंबित गुन्हेगारी खटल्यांची माहिती निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर, Know Your Candidate या लिंकवर उपलब्ध असेल.