डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीची १० उमेदवारांची यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी ८ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला आणि दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कडू यांना अचलपूरमधून तर अनिल चौधरी यांना रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. चांदवड विधानसभा मतदारसंघातून गणेश निंबाळकर, देगलूर बिलोलीमधून सुभाष साबणे, ऐरोलीमधून अंकुश कदम, हदगाव हिमायतनगरमधून माधव देवसरकर, हिंगोलीमधून गोविंदराव भवर, राजुरामधून वामनराव चटप यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.