आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती, त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर

आतापर्यंत १७७ जागांचे कल हाती आले आहेत. त्यात सर्वाधिक ६१ जागांवर भाजप आघाडीवर आहे. दहिसर मतदार संघात मतमोजणीच्या पहिल्या फेरीअखेर  भाजपच्या उमेदवार मनिषा चौधरी त्यांच्या निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाचे विनोद घोसाळकर यांच्या पेक्षा १ हजार ६२३  मतांनी आघाडीवर आहेत.  

पालघर मतदार संघात मतमोजणीच्या दुसऱ्या फेरीअखेर  शिवसेनेचे उमेदवार राजेंद्र गावित, त्यांचे  निकटचे प्रतिस्पर्धी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जयेंद्र दुबळा यांच्या पेक्षा १०२ मतांनी आघाडीवर आहेत. 

मावळ मतदार संघात मतमोजणीच्या पाचव्या  फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे   उमेदवार सुनील शेळके, त्यांचे  निकटचे प्रतिस्पर्धी महाविकास आघाडीचे बापूसाहेब भेगडे यांच्या पेक्षा १९ हजार ६९३ मतांनी आघाडीवर आहेत. 

संगमनेर मतदार संघात मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर काँग्रेसचे बाळासाहेब थोरात ६ हजाराहून अधिक मतांनी पिछाडीवर आहेत.

चिपळूण मतदार संघात मतमोजणीच्या चौथ्या फेरीअखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रशांत बबन यादव त्यांचे  निकटचे प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे शेखर गोविंदराव निकम यांच्या पेक्षा ७५२ मतांनी आघाडीवर आहेत. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.