डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

विधानसभेसाठी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध क्षेत्रातील नामवंतांनी मतदानाचा हक्क बजावला

विधानसभेसाठी सर्वसामान्य नागरिकांबरोबरच विविध क्षेत्रातील नामवंतांनी देखील आज मतदानाचा हक्क बजावला. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रिझर्व बँकेचे गव्हर्नर शशिकांत दास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, ज्येष्ठ गायिका आशा भोसले, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर, मुख्य सचिव सुजाता सौनिक, मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम, मुंबईचे पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री रामदास आठवले, रक्षा खडसे, प्रकाश आंबेडकर, हेमामालिनी, नाना पाटेकर, शाहरुख खान, रितेश आणि अभिनेत्री जिनिलिया देशमुख, राकेश रोशन, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, राजकुमार राव यांच्यासह मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी मतदानाचा हक्क बजावला. याशिवाय विविध ठिकाणी खासदार, आमदार, वरिष्ठ अधिकारी यांनी मतदान केलं.