डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला यश-मुख्यमंत्री

सर्वसामान्यांच्या विकासाला प्राधान्य देऊन घटक पक्षांनी एकत्र काम केल्यामुळे विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला ऐतिहासिक विजय मिळाल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. सर्वांगीण विकास करताना सर्व घटकांचा विचार केला आणि लाडकी बहीणसारख्या योजना दिल्याचं त्यांनी सांगितलं. 

योजना फक्त कागदावर न ठेवता त्याची अंमलबजावणीही केल्याचं ते म्हणाले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि अजित पवार हेही उपस्थित होते. मोदी सरकारच्या पाठबळामुळे हा विजय शक्य झाल्याचं फडनवीस यांनी सांगितलं.हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा विजय असल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.