सर्वंकष नाट्यगृह धोरण लवकरच तयार करण्यात येणार असल्याची सांस्कृतिक कार्यमंत्र्यांची घोषणा

महाराष्ट्र हे कलासंपन्न राज्य आहे. त्यामुळे इथली नाट्यगृहं कशी असावीत तसंच कलाकार आणि प्रेक्षकांना काय सुविधा असाव्यात याविषयी सर्वंकष नाट्यगृह धोरण येत्या दोन महिन्यात तयार करण्यात येईल अशी घोषणा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशीष शेलार यांनी आज केली. वर्धा इथे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या लोकार्पण प्रसंगी ते बोलत होते. यावेळी शेलार यांच्या हस्ते साडेआठ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांचं भूमिपूजनही करण्यात आलं.