September 18, 2025 8:32 PM | Maharashtra

printer

राज्य सरकार आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया यांच्यात सामंजस्य करार

राज्य सरकारनं केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया सोबत आज मुंबईत सामंजस्य करार केला. महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडिया कडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. या सामंजस्य कराराअंतर्गत शिक्षकांसाठी विषयानुरूप प्रशिक्षण कार्यक्रम, राष्ट्रीय शिक्षण धोरणास अनुरूप आणि सीबीएसई-सुसंगत शैक्षणिक साधनसामग्री, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्रे तसंच विद्यार्थ्यांसाठी ‘क्लायमेट क्वेस्ट’ सारखा हवामान शिक्षण कार्यक्रम आणि पूर्व-प्राथमिक अभ्यासक्रम केंब्रिज उपलब्ध करून देणार आहे. याशिवाय डिजिटल साक्षरता, आयसीटी आधारित शिक्षण, जीवनकौशल्ये व मूल्यशिक्षणाशी संबधित अभ्यासक्रमही राज्यातील शाळामध्ये राबवले जातील.