Maharashtra: कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण

राज्याच्या कृषी विभागाच्या बोधचिह्न आणि घोषवाक्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत काल झालं. ‘शाश्वत शेती, समृद्ध शेतकरी’ असं घोषवाक्य कृषी विभागाने स्वीकारलं आहे. राज्यभरातून स्पर्धकांनी पाठवलेल्या सतराशे घोषवाक्यांमधून या घोषवाक्याची निवड करण्यात आली आहे. तंत्रज्ञानावर आधारित आधुनिक शेतीसाठी सरकार वचनबद्ध आहे हे या बोधचिह्नामधून दिसून येतं,  असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. हे बोधचिह्न आणि घोषवाक्य कृषी विभागाच्या सर्व उपक्रमांमधे वापरलं जाईल, असं कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितलं. हे बोधचिह्न  भुसावळचे वीरेंद्र पाटील आणि घोषवाक्य परभणीच्या सिद्धी देसाई यांनी तयार केलं आहे. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.