राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांनी व्यक्तिगत कारण देऊन आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. याबाबतचं पत्र त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दिलं आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये डॉ. सराफ यांची महाधिवक्ता पदावर नियुक्ती झाली होती, आता तीन वर्षांच्या कार्यकाळानंतर ३० सप्टेंबर रोजी पदभार सोडतील.
Site Admin | September 16, 2025 3:55 PM
राज्याचे महाधिवक्ता डॉ. बिरेंद्र सराफ यांचा राजीनामा
