राज्य सरकारने आज ब्लॅकस्टोन समूहाच्या एक्सएसआयओ लॉजिस्टिक्स पार्क्स आणि होरायझन इंडस्ट्रियल पार्क्स यांच्याशी एक महत्त्वपूर्ण सामंजस्य करार केला. या करारानुसार राज्यात दहाहून अधिक औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स पार्क उभारले जाणार आहेत. यासाठी नागपूर, मुंबई, चाकण, खंडवा, सिन्नर, पनवेल याठिकाणी ७९४ एकरपेक्षा जास्त जमीन अधिगृहित केली जाईल. या सर्व प्रकल्पांमधे ५ हजार १२७ कोटी रुपयांची परकीय गुंतवणूक केली जाणार आहे. या पार्कमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष असे २७ हजार रोजगार निर्माण होणार आहेत.
हा करार जागतिक दर्जाचे पर्यावरणस्नेही औद्योगिक आणि लॉजिस्टिक्स हब तयार करण्याच्या दिशेनं टाकलेलं पाऊल आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यावेळी म्हणाले.