राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून राज्य सरकार विकसित करणार आहे. नागपूरमधल्या काटोल तालुक्यातली १०, अमरावतीमधल्या चांदूरबाजारमधली २३, हिंगोलीतल्या कळमनुरीतली ११, बारामतीमधली १० आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वैभववाडी तालुक्यातल्या २१ गावांचा यात समावेश आहे. यासंदर्भातला शासन आदेश आज सरकारनं जारी केला. नागपूरमधल्या सातनवरीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर या प्रकल्प राबवण्यात आला. याअंतर्गत शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, नवीकरणीय ऊर्जा, ई-शासन, डिजिटल संपर्क क्षेत्रातले विविध प्रकल्प राबवले जातात. शहरं आणि गावं यातलं अंतर कमी करणं, ग्रामीण भागातलं जीवनमान उंचावणं हा या प्रकल्पाचा उद्देश आहे. यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली सरकारनं समिती स्थापन केली आहे.
Site Admin | November 27, 2025 7:09 PM | Maharashtra
राज्यातल्या ५ जिल्ह्यांमधली ७५ गावं, स्मार्ट आणि इंटलिजंट व्हिलेजेस म्हणून विकसित होणार