वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांच्या राष्ट्रव्यापी अंमलबाजवणी अभियानात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर आहे, अशी माहिती या अभियानासंदर्भातल्या अंतिम प्रगती अहवालात देण्यात आली आहे. या अभियानाच्या काळात महाराष्ट्रात सुमारे १ कोटी ४० लाख लाभार्थ्यांपर्यंत विविध सरकारी योजनांचे लाभ पोहचवण्यात आले. या यादीत उत्तर प्रदेश प्रथम तर राजस्थान दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
वित्तीय समावेशन आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती सर्व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देशानं १ जुलै ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत हे अभियान चालवण्यात आलं. अभियान काळात देशभरात प्रधानमंत्री जनधन योजनेत ६ लाखाहून अधिक खाती उघडण्यात आली, तर अटल निवृत्त्ती वेतन योजनेत सुमारे २ लाख नवे लाभार्थी जोडले गेले, अशी माहिती या अहवालात देण्यात आली आहे.