November 5, 2025 3:18 PM | Maharashtra

printer

राज्यात केंद्रीय पथकानं केली अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी

राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी आणि पुरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केंद्रीय पथकानं आज केली.

 

सोलापूर जिल्ह्यात दक्षिण सोलापूर तालुक्यात बडकबाळ आणि हत्तूर आणि उत्तर सोलापूरच्या तिऱ्हे आणि शिवणी या गावांना भेट देऊन शेती, पायाभूत सुविधा आणि सार्वजनिक मालमत्तेच्या नुकसानीचा आढावा केंद्रीय पथकानं घेतला.

 

बीड जिल्ह्यात केंद्रीय पथकानं आज पाहणीला सुरुवात केली. इथं ११ तालुक्यांमध्ये पिकांसह जमिनीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. तसंच पशुधन आणि घरांनाही मोठा फटका बसला आहे.

 

अहिल्यानगर जिल्ह्यातही केंद्रीय पथकानं आज अतिवृष्टी आणि पुराचा फटका बसलेल्या विविध भागांना भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.