प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय आणि त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारणीला राज्य सरकारचं प्राधान्य आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगितलं. औंंध इथं बहुउद्देशीय दंंत रुग्णालय आणि संशोधन केंद्र स्थापन करण्याबाबत इंडियन डेंटल असोसिएशन, पुणे जिल्हा परिषद आणि औंधचं जिल्हा शासकीय रुग्णालय यांच्यामध्ये सामंजस्य करार झाला, त्यावेळी पवार बोलत होते. हा सामंजस्य करार राज्याच्या सार्वजनिक आरोग्य सेवेतील नवा अध्याय आहे असे सांगून सर्वसामान्य नागरिकांना माफक दरात दंत विषयक आरोग्य सुविधा उपलब्ध होतील असा विश्वास पवार यांनी व्यक्त केला.
Site Admin | November 3, 2025 3:31 PM | DCM Ajit Pawar | Maharashtra
वैद्यकीय महाविद्यालय आणि आवश्यक पायाभूत सुविधांसाठी सरकारचं प्राधान्य – उपमुख्यमंत्री अजित पवार