केंद्र सरकारच्या किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत मूग, उडीद आणि सोयाबीन पिकांच्या खरेदीला येत्या १५ नोव्हेंबरपासून सुरुवात होणार असून त्यासाठी शेतकऱ्यांना ॲपद्वारे किंवा खरेदी केंद्रांवर ऑनलाईन नोंदणी करता येईल. या नोंदणीला 30 ऑक्टोबरपासून सुरुवात झाली आहे तर अंतिम मुदत ३१ डिसेंबर आहे.
खरेदीचा कालावधी १५ नोव्हेंबरपासून पुढील ९० दिवसांसाठी असेल. शेतकऱ्यांनी नजीकच्या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी कागदपत्रांसह अर्ज करावा आणि नाफेडच्या धान्य खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असं आवाहन पणन अधिकाऱ्यांनी केलं आहे.