राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत चालू आर्थिक वर्षात केंद्र सरकारच्या वाट्याचा दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर झाला आहे. यामुळे यंदाच्या मान्सून काळात अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळं बाधित झालेल्यांना तात्काळ मदत देण्यासाठी आणि त्यांच्या पुनर्वसनासाठी १ हजार ५६६ कोटी ४० लाख रुपये निधी महाराष्ट्राला मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल समाज माध्यमावरून ही माहिती दिली. या मदतीसाठी त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले. ही अग्रिम मदत असून अंतिम मदत प्राप्त करण्यासंदर्भातली प्रक्रिया अजून सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.
Site Admin | October 20, 2025 3:07 PM | Maharashtra
राज्य आपत्ती प्रतिसाद निधी अंतर्गत दुसरा हप्ता महाराष्ट्राला मंजूर
