राज्यातून होणारी निर्यात दहा पटीनं वाढवण्यासाठी 12 नवीन धोरणं आणली जात असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं. या धोरणांमुळे उद्योजकांना दिलासा मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. गेल्या तीन वर्षांच्या “महाराष्ट्र राज्य निर्यात पुरस्कारां”चं वितरण सामंत यांच्या हस्ते झालं. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
महाराष्ट्राला उद्योग क्षेत्रात कायमस्वरूपी ‘एक नंबर’ वर ठेवण्यासाठी आवश्यक ती ताकद उद्योजकांना देण्याची राज्य शासनाची तयारी आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली.
निर्यात वाढीसाठी उत्कृष्ट कार्य केलेल्या रत्नागिरी, नागपूर, गडचिरोली आणि लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना, यावेळी प्रशस्तिपत्रक देऊन सन्मानित करण्यात आलं.