October 9, 2025 3:02 PM | Maharashtra

printer

पूरग्रस्तांना मदत म्हणून १ दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचं राज्य सरकारचं आवाहन

राज्यातल्या पूरग्रस्तांना मदत म्हणून १ दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करण्याचं आवाहन राज्य सरकारनं सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना केलं आहे. त्यासाठीचं संमतीपत्रक कार्यालयात उपलब्ध करुन देण्याचे आदेश सरकारनं काल जारी केले. राज्य सरकारच्या सेवेतले सर्व अधिकारी-कर्मचारी, विविध स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक उपक्रम, महामंडळातल्या अधिकारी – कर्मचाऱ्यांनाही त्यांचं  एक दिवसाचं वेतन मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा करता येईल.