राज्यात अतिवृष्टीग्रस्त नागरिकांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. पुण्यात आज ते वार्ताहरांशी बोलत होते. राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून भरीव मदत देण्याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना निवेदन दिल्याचंही पवार यावेळी म्हणाले. पुराच्या पाण्यामुळे नुकसान झालेल्यांना ५ हजार रुपये आर्थिक मदत आणि १० किलो धान्य दिलं जाणार आहे. गरजेनुसार, धान्याची मदत वाढवण्याचेही प्रयत्न सुरू असल्याची माहिती पवार यांनी वार्ताहरांना दिली.
Site Admin | September 26, 2025 7:00 PM | DCM Ajit Pawar | Maharashtra
अतिवृष्टीग्रस्तांना सरकारकडून मदत पोहोचवली जात असल्याची उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती
