गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण उपक्रमांना चालना देण्यासाठी काम करणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना ५ कोटी, ३ कोटी आणि २ कोटी रुपयांची प्रोत्साहनपर पारितोषिकं देण्यात येतील, अशी घोषणा शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी आज पुण्यात केली. राज्यस्तरीय शालेय शिक्षण परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. विद्यार्थ्यांना ऐतिहासिक स्थळांचं महत्त्व कळावं, शेतीतील कामांचं निरीक्षण करता यावं, बँकेचे व्यवहार समजावेत यासाठी शैक्षणिक सहली काढण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.
Site Admin | September 19, 2025 7:00 PM | Maharashtra
शिक्षण उपक्रमांना चालना देणाऱ्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांना कोटींचं पारितोषिक