राज्यातल्या २४ नगरपरिषदां – नगरपंचायतींसाठी उद्या मतदान

राज्यातल्या २४ नगर परिषदा आणि नगर पंचायती तसंच १५४ सदस्यपदांसाठी उद्या मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहोचत आहेत. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाविरुद्ध जिल्हा न्यायालयात अपील झालेल्या प्रकरणांमुळे २ डिसेंबरला होणारं मतदान राज्य निवडणूक आयोगानं उद्यापर्यंत पुढे ढकललं होतं. 

 

यवतमाळ, वाशीम, बारामती, अंबरनाथ, महाबळेश्वर, फलटण, कोपरगाव, देवळालीप्रवरा, पाथर्डी, नेवासा, फुरसुंगी- उरुळी देवाची, अनगर, मंगळवेढा, फुलंब्री, मुखेड, धर्माबाद, निलंगा, रेणापूर, बसमत, अनंजनगाव सूर्जी, बाळापूर, देऊळगावराजा, देवळी, घुग्घूस या नगरपरिषदा आणि नगर पंचायतींसाठी हे मतदान होणार आहे. याशिवाय विविध जिल्ह्यातल्या ७६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधल्या १५४ सदस्यपदांसाठीही उद्या मतदान होणार आहे. या सर्व जागा तसंच २ डिसेंबरला मतदान झालेल्या ठिकाणांची एकत्रित मतमोजणी रविवारी होईल.