प्रधानमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमाचं आयोजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ७५व्या वाढदिवसानिमित्त आज राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. पर्यटन विभागामार्फत राज्यातला साडे सात हजार तरुणांना प्रशिक्षण देण्याचा ‘नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रम’ आणि पर्यटकांना सुविधा देणारे ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्र’ पाच ठिकाणी उभारण्यात असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. राज्यातल्या ४१९ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमधून आणि ५०० खाजगी आयटीआय मधून हजारो विद्यार्थी आणि शिक्षकांनी ७५० गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवलं. 

मुंबईत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आज मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशीष शेलार यांच्या हस्ते भारतीय प्रजातीच्या ७५ दुर्मीळ वृक्षांची लागवड झाली. 

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.