सौरऊर्जा आणि विदा क्षेत्रातल्या १० सामंजस्य करारांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात स्वाक्षऱ्या झाल्या. या सामंजस्य करारांमुळे राज्यात ४२ हजार ८९२ कोटी रुपयांची गुंतवणूक होणार असून २५ हजार ८९२ रोजगारांची निर्मिती होणार असल्याची माहिती यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिली.
राज्यात गुंतवणुकीसाठी अनुकूल वातावरण मिळावं याकरता राज्य शासन संपूर्ण प्रक्रियेत सहभागी राहील, असं सांगताना फडणवीस यांनी हायपरलूप प्रकल्पालाही गती मिळत असल्याचं सांगितलं. या प्रकल्पामुळे लॉजिस्टिक, वाहतूक आणि मोबिलिटी क्षेत्रात राज्यासह संपूर्ण देशात आमूलाग्र बदल घडवणार असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.