डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

August 5, 2025 3:39 PM | Maharashtra

printer

महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार

कोल्हापूर जिल्ह्यातल्या नांदणी मठातली महादेवी हत्तीण परत आणावी, ही जनभावना लक्षात घेत, राज्य शासन या संदर्भात स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात भूमिका मांडेल, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे. महादेवी हत्तिणीच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राज्य शासन याप्रकरणात पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचं त्यांनी सांगितलं. नांदणी मठानं सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी, असंही मुख्यमंत्री म्हणाले. हत्तीणीची निगा राखण्यासाठी राज्य सरकार डॉक्टरचा समावेश असलेलं एक पथक तयार करेल. या प्रकरणात नागरिकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील, असं  त्यांनी सांगितलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा