अर्थकारणांच्या सर्वच महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर आहे, असा अहवाल मॉर्गन स्टॅनले या वित्तीय संशोधन क्षेत्रातल्या ख्यातनाम वित्तीय संस्थेने प्रकाशित केला आहे. या अहवालात महाराष्ट्र अनेक क्षेत्रांचं नेतृत्व करत असल्याचं नमूद केलं आहे. आर्थिक विकास, पायाभूत सुविधा सामाजिक न्याय, वित्तीय शिस्त, ऊर्जा क्षेत्रातील सुधारणा यांसह विविध क्षेत्रांतल्या कामगिरीची दखल यात घेतली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी या अहवालाचं आणि त्यातल्या निष्कर्षांचं स्वागत केलं आहे. अहवालातले हे निष्कर्ष म्हणजे महाराष्ट्रानं विविध क्षेत्रांसाठी स्वीकारलेली धोरणं आणि त्यानुसार सुरु असलेली सकारात्मक वाटचाल यांचं द्योतक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
Site Admin | July 25, 2025 3:01 PM | Maharashtra
अर्थकारणाच्या सर्वच महत्वाच्या क्षेत्रांमध्ये महाराष्ट्र अग्रेसर असल्याचा मॉर्गन स्टॅनलेचा अहवाल
