महाराष्ट्र हे देशातलं सर्वात मोठं इलेक्ट्रिक वाहन उत्पादन क्षमता असलेलं राज्य ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज व्यक्त केला. प्रसिद्ध इलेक्ट्रिक कार निर्माता कंपनी टेस्लाने भारतीय बाजारात प्रवेश केला असून मुंबईत त्यांच्या पहिल्या सेंटरचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आज झालं, तेव्हा ते बोलत होते.
मुंबईनंतर भारतातील आणखी दोन शहरांमध्ये सेवा विस्तारित केली जाणार असून, मुंबईत चार मोठे चार्जिंग हब आणि ३२ चार्जिंग स्टेशन उभारली जात असल्याची माहितीही फडनवीस यांनी यावेळी दिली.