बंदरं आणि लॉजिस्टिक क्षेत्राला कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी कौशल्य विकास विभाग, बंदरे विभाग आणि अटल सोल्युशन यांच्या दरम्यान काल एक सामंजस्य करार करण्यात आला. त्यानुसार नेदरलँड्स, डेन्मार्क आणि पोलंडमधील पतसंस्था १२० कोटी रूपयांची गुंतवणूक महाराष्ट्रात करणार आहेत. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, बारामती, सिंधुदुर्ग, नागपूर आणि नाशिकमधील सहा निवडक ‘आयटीआय’ संस्थाचं आधुनिकीकरण करण्यात येणार असल्याचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या करारप्रसंगी बोलताना सांगितलं.
Site Admin | July 9, 2025 9:23 AM | Maharashtra
राज्यातल्या ITI संस्थाच्या आधुनिकीकरणासाठी परदेशी पतसंस्थांद्वारे १२० कोटींची गुंतवणूक
