डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

June 14, 2025 2:58 PM | Maharashtra

printer

पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं आज प्रदान

संपूर्ण जग आज भारताकडे फक्त एक जागा म्हणून नाही, तर ज्ञान आणि माहितीच्या क्षेत्रातला भागीदार म्हणून बघत आहे, असं प्रतिपादन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज केलं. पाच परदेशी विद्यापीठांची संकुलं महाराष्ट्रात उभारण्यासाठीची इरादापत्रं या विद्यापीठांना आज देण्यात आली, या कार्यक्रमात ते मुंबईत बोलत होते. विकसित भारताच्या प्रवासात हा एक महत्त्वाचा टप्पा असून शिक्षणामुळेच देशाचं भविष्य सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. विद्यार्थ्यांना आपल्या देशातच जागतिक दर्जाचं शिक्षण परवडण्याजोग्या शुल्कात मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 

 

परदेशी शिक्षणसंस्थांसाठी भारताची दारं उघडण्यात नवीन शैक्षणिक धोरणानं महत्त्वाची भूमिका बजावली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. विविध परदेशी विद्यापीठांची संकुलं असलेली एक पूर्ण नवी एज्युसिटी भारतात, विशेषतः नवी मुंबईत उभारण्यात येईल, असं आश्वासन त्यांनी दिलं. 

 

या कार्यक्रमात इंग्लंडमधली युनिव्हर्सिटी ऑफ अॅबरडीन, युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क, युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया, अमेरिकेतलं इलिनॉय टेक आणि इटलीचं आयईडी स्कूल ऑफ डिझाइन या संस्थांना त्यांची संकुलं राज्यात सुरू करण्यासाठीची इरादापत्रं देण्यात आली. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, या पाचही विद्यापीठांचे प्रतिनिधी, सिडको आणि विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकारी आणि इतरही या कार्यक्रमाला उपस्थित होते.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा